वारंवार धमक्या येणाऱ्या प्रा. राम पुनियानी यांना पोलिस संरक्षण देणार का?

वारंवार धमक्या येणाऱ्या प्रा. राम पुनियानी यांना पोलिस संरक्षण देणार का?

विख्यात शिक्षण तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते प्रा. राम पुनियांनी यांना पुन्हा काही गुंडांकडून धमक्या देण्यात आल्या आहेत. मुंबई आयआयटीचे माजी प्राध्यापक असलेल्या प्रा. पुनियानी यांना ६ जूनला रात्री त्यांच्या घरातील फोनवर धमक्या देण्यात आल्या. याविरोधात पुनियानी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. इतिहासाची तर्कवादी पद्धतीनं प्रा. पुनियांनी हे देशभर मांडणी करतात.
प्रा. राम पुनियानी यांच्याशी या संदर्भात आम्ही बातचित केली असता, त्यांनी या सर्व घटनेसंदर्भात माहिती दिली.मात्र, प्रा. राम पुनियानी यांना दुसऱ्यांदा धमकी आल्यानं त्यांच्या कुटुंबासह बुद्धीजीवी वर्गात भितीचं वातावरण आहे. त्यातच महाराष्ट्रात या पद्धतीने विचाराची मांडणी करणाऱ्या गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोळकर यांच्या देखील हत्या झाल्या आहेत. त्यामुळं ही पार्श्वभूमी लक्षात घेता पोलिस प्रशासन राम पुनियानी यांना संरक्षण देणार का? असा सवाल उपस्थित होतो.