पारलेजी नंतर ब्रिटानियावर मंदीचा परिणाम

पारलेजी नंतर ब्रिटानियावर मंदीचा परिणाम

fmcg-major-britannia-to-increase-prices-marginally-to-beat-slowdown-vinay-subramanyam-parle-g
उद्योग क्षेत्रात आलेल्या मंदीमुळे पारलेजी कंपनीतील 10 हजार कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कायम असताना आता ब्रिटानिया कंपनीवर देखील मंदीचा परिणाम झाला आहे. ब्रिटानिया कंपनीचे प्रमुख (विपणन) विनय सुब्रमण्यम यांनी माध्यमांशी बोलताना गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून मंदी दिसत असून जानेवारीपर्यंत ही स्थिती कायम राहू शकते म्हणून तिसऱ्या तिमाहीत कंपनी उत्पादनांच्या किंमतीमध्ये वाढ करण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
‘आम्ही मागच्या 5 ते 6 महिन्यांपासून मंदी पाहत आहोत, पुढचे पाच – सहा महिने सोपे नाहीत, उदयोग जगतात सकारात्मकता नाही.’
‘आम्ही कंपनीच्या आर्थिक स्थितीवर नजर ठेऊन आहोत. मान्सूनचा सकारात्मक परिणामाचा विचार कंपनी करत आहे. आम्ही कंपनीच्या उत्पादनाची किंमत वाढण्याबरोबरच कंपनी खर्चावर देखील कपात करण्याचा विचार करत आहोत.’