Home News Update शासकीय कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा केल्यानं प्रतिवर्ष कामाचे तास वाढणार…!

शासकीय कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा केल्यानं प्रतिवर्ष कामाचे तास वाढणार…!

Courtesy : Social Media
Support MaxMaharashtra

राज्यातील शासकीय कार्यालयांसाठी राज्यशासनाने पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. आता तुम्ही म्हणत असाल की, शासकीय कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा केल्यानं कामाचे तास कमी होतील. मात्र, या निर्णयाने कामाचे तास वाढणार आहेत.

केंद्राप्रमाणे राज्यातील शासकीय कार्यालयांना प्रत्येक महिन्यातील सर्व शनिवारी व रविवारी सुट्टी राहील. या सोबतच दररोज 45 मिनिटांचे वाढीव काम अधिकारी व कर्मचाऱ्यांना करावे लागणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 29 फेब्रुवारीपासून होणार आहे.

प्रतिवर्ष कामाचे तास वाढणार मात्र, ते कसे?

सध्याच्या कार्यालयीन वेळेमुळे वर्षातील सरासरी कार्यालयीन दिवस 288 होतात. भोजनाचा 30 मिनिटांचा कालावधी वगळून प्रतिदिन 7 तास 15 मिनिटे प्रतिदिन कामाचे तास होतात. यामुळे एका महिन्यातील कामाचे तास 174 तर एका वर्षातील कामाचे तास 2088 इतके होतात.

मात्र, राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे कामाचे तास वाढणार आहेत.

पाच दिवसांच्या आठवड्यामुळे वर्षातील सरासरी कार्यालयीन दिवस 264 होतील. मात्र, कामाचे 8 तास होतील. परिणामत: एका महिन्यातील कामाचे तास 176 तर वर्षातील कामाचे तास 2112 इतके होतील. म्हणजेच प्रतिदिन 45 मिनिटे, प्रतिमहिना 2 तास आणि प्रतिवर्ष 24 तास इतके कामाचे तास वाढतील.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997