Home मॅक्स रिपोर्ट सलग रात्रीपासून 5 तालुक्यात झाली अतिवृष्टी…

सलग रात्रीपासून 5 तालुक्यात झाली अतिवृष्टी…

Support MaxMaharashtra

भंडारा जिल्ह्यात काल सायंकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. जिल्ह्यातील ७ तालुक्यापैकी ५ तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे,  मागील महिन्याभरापासून पावसाने धडी मारल्याने येथील शेतकरी चिंतातुर झाले होते. काही ठिकाणी रोवऱ्या थांबल्या तर ज्या रोवण्या पूर्ण झाल्या होत्या त्यांचे पीक धोक्यात आले होते. मात्र काल सकाळ पासूनच पावसाचे पुनरागमन झाले आहे. दिवसभर पावसाची उघडझाप सुरु होती, मात्र सायंकाळी ७ वाजल्यापासून पावसाने जोर धरला आणि हा पासून संपूर्ण रात्रभर पडत राहिल्याने जिल्हयात बर्याच प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे.

लाखांदूर तालुक्यात १२५ मीमी एवढा पाऊस पडला आहे. भंडारा तालुक्यात ८८ मीमी, लाखनी तालुक्यात ८० मीमी, मोहाडी तालुक्यात ९८ मीमी आणि तुमसर तालुक्यात ७० मीमी पाऊसाची नोंद झाली आहे. या अतिवृष्टी मुळे सध्या तरी कोणतीही जीवीत हानी झाली नसली तरी नदी – नाले भरून वाहत आहेत. अजूनही पावसाचे सावट असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार भंडारामध्ये मुसळधार पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  काल संपूर्ण जिल्ह्यात पाऊस पडल्यामुळे जे पीक धोक्यात आले ते सुरक्षित झाले आहे तर ज्या शेतकऱ्यांच्या रोवण्या थांबल्या आहे ते नक्कीच आज कामाला लागतील असे संकेत दिसत आहेत.

 

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997