Home मॅक्स रिपोर्ट  ‘पुन्हा आणुया आपले सरकार’ टी-शर्ट घालून शेतकऱ्याची आत्महत्या

 ‘पुन्हा आणुया आपले सरकार’ टी-शर्ट घालून शेतकऱ्याची आत्महत्या

4845
farmer-committed-suicide-wearing-bjp-tshirt-in-buldhana-maharashtra-assembly
बुलढाणा, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्या दरम्यान एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ‘पुन्हा आणूया आपले सरकार’ असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या टी-शर्ट वर लिहिलेले आहे.
राज्यात विधानसभा निवडणूका सुरु आहे. प्रत्येक पक्षाच्या आश्वासनांच्या टोपलीत शेतकऱ्यांचा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यातच आज मुख्य़मंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. काही वेळातच जळगाव जामोद मतदार संघामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे.
कामगार मंत्री डॉ संजय कुटे यांच्या मतदार संघातील ही घटना आहे. शेगाव तालुक्यातील खातखेड इथं सकाळी 11 वाजता ही घटना घडली आहे. 35 वर्षीय राजू ज्ञानदेव तलवारे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. कर्जबाजारीपणामुळे त्याने आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, शनिवारी संध्याकाळी यवेल्यामध्येही एका तरुण शेतकऱ्याने कर्जबारीपणामुळे आत्महत्या केली. त्यामुळे निवडणुकांमध्येही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नसल्याने शेतकऱ्यांसाठी झालेल्या कर्जमाफीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
त्याचबरोबर केंद्रातून महाराष्ट्रात प्रचाराला येणाऱ्या जवळ जवळ सर्व नेत्यांच्या भाषणात सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय देखील शोधून सुद्धा सापडत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणुका नक्की कोणत्या मुद्द्यावर सुरु आहेत हा प्रश्न मतदाराला पडल्याशिवाय राहत नाही.
Support MaxMaharashtra

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997