Top
Home > Fact Check > पायल अब्दुल्लांचा तो इंटरव्यू का होतोय व्हायरल?

पायल अब्दुल्लांचा तो इंटरव्यू का होतोय व्हायरल?

पायल अब्दुल्लांचा तो इंटरव्यू का होतोय व्हायरल?
X

तीन वर्षांपासून ओमर ने मला पैसे दिलेले नाहीत, मुलांचा खर्च ही तो उचलत नाही. झेड प्लस सिक्योरिटी त्यासाठी लागणारी जागा, खर्च याचा दरमहा 15 लाख रुपये खर्च त्याने दिला पाहिजे, जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची पत्नी पायल नाथ-अब्दुल्ला यांचा हा इंटरव्यू तुमच्या व्हॉटसऍप वर आला असेल. तुम्ही तो फॉरवर्ड ही केला असेल. अनेक मान्यवर लोकांकडून सध्या हा इंटरव्यू फॉरवर्ड होतोय. यात अनेक सिने कलाकार, वरिष्ठ पत्रकार सामील आहेत. अशा नामवंत लोकांकडून फॉरवर्ड होणाऱ्या या इंटरव्यूची विश्वासार्हता निश्चितच मोठी मानली जाते.

[video width="336" height="270" mp4="http://maxmaharashtra.com/wp-content/uploads/2019/08/omar-abdulla.mp4"][/video]

एबीपी न्यूज ला दिलेल्या या इंटरव्यू मध्ये पायल नाथ –अब्दुल्ला ओमर अब्दुल्ला यांच्या विरोधातल्या घटस्फोट केस बद्दल सांगतायत. तीन वर्षा पासून ओमर लक्ष देत नसल्याचं ही सांगतायत. हा इंटरव्यू 2016 चा आहे.

त्याआधीचे तीन वर्षे म्हणजे 2013 पासून ओमर लक्ष देत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. या इंटरव्यू नंतर ओमर अब्दुल्ला यांच्या वकिलांनी अधिकृतपणे याचं स्पष्टीकरण दिलं होतं. 2018 मध्ये तर ओमर अब्दुल्ला यांनी आपल्याच पत्नीशी पुन्हा विवाह कऱण्याची इच्छा ही कोर्टासमोर बोलून दाखवली होती. या बातम्याही इंटरनेटवर उपलब्ध आहेत.

370 कलम रद्दबातल केल्यानंतर प्रमुख कश्मिरी नेत्यांना नजरकैदेत ठेवल्याचं समोर आलं होतं. अशावेळी कश्मिरी नेत्यांसंदर्भातले जुने व्हिडीयो किंवा बातम्या काही ठराविक लोकांकडून जाणीवपूर्वक पसरवून कश्मिरी नेत्यांविरोधात जनभावना तयार करायचं काम सुरू आहे. सध्या व्हायरल झालेला व्हिडीयो हा त्याचाच एक भाग आहे.

Updated : 8 Aug 2019 4:03 AM GMT
Next Story
Share it
Top