Fact Check | पुण्यातील डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची चुकीची माहिती होतेय व्हायरल

675

कोरोनासंबंधी रोज नवनवीन माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यातील खरी माहिती कोणती आणि अफवा कोणती हे ओळखणंही कठीण झालंय.

पुण्यातील डॉ. मेघा व्यास यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आज अनेक ठिकाणी व्हायरल आहे. फेसबुक आणि व्हॉट्सअपवर अनेकांनी ही माहिती आणि एक फोटो पोस्ट आणि शेअर केला आहे. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना त्यांना लागण झाली होती आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचं या पोस्टमध्ये सांगण्यात येतंय.

हे आहे वास्तव :

या फोटोतील महिला या मेघा व्यास नसून मेघा श्रीकांत शर्मा आहेत. त्यांचा २२ एप्रिल रोजी पुण्यातील जहांगीर रुग्णालयात मृत्यू झाला. त्या डॉक्टर नव्हत्या. त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. जहांगीर रुग्णालयाने दिलेल्या पत्रात मेघा यांचा मृत्यू तीव्र न्यूमोनियाने झाल्याचं म्हटलंय.

मेघा यांचे पती डॉ. श्रीकांत शर्मा यांनी सांगितलं की, सोशल मीडियावर मेघा यांचे फोटो अशाप्रकारे व्हायरल झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागतोय.

मेघा यांच्याबाबत अशा खोट्या पोस्ट शेअर करू नका असं आवाहन शर्मा कुटुंबाने केलंय. मेघा यांच्याविषयी खोटी पोस्ट शेयर करणाऱ्यांविरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार करत असल्याचे डॉ. श्रीकांत यांनी सांगितलंय.

Fact Check | मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या ६ लाखांवर जाणार? महापालिकेने केला खुलासा
Fact Check | यूपीएससी परिक्षेसंदर्भातील ‘एबीपी माझा’ची बातमी चुकीची
Fact Check | फळांवर थुंकी लावणाऱ्या ‘त्या’ व्हिडीओचं सत्य