Home > Fact Check > Fact Check | सहारनपूरमध्ये तब्लिकींनी मागितलं चिकन, मोकळ्यात शौच; हे आहे वास्तव!

Fact Check | सहारनपूरमध्ये तब्लिकींनी मागितलं चिकन, मोकळ्यात शौच; हे आहे वास्तव!

Fact Check | सहारनपूरमध्ये तब्लिकींनी मागितलं चिकन, मोकळ्यात शौच; हे आहे वास्तव!
X

दिल्लीतील निजामुद्दीन मरकजमधील तब्लिकी जमातची लोकं आपापल्या राज्यात परतल्यानंतर त्यांना शोधून क्वारंटाईन करण्यात आलं आहे. ही मंडळींना त्या त्या राज्यातील शासकीय क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलंय.

उत्तर प्रदेशातल्या सहारनपूरमध्ये तब्लिकी जमातचे लोक सेंटरमधील आरोग्य कर्मचाऱ्यांशी गैरव्यवहार करत आहेत. त्यांच्याकडे नॉनव्हेज आणि बिर्याणीची मागणी करत आहेत आणि कर्मचाऱ्यांनी मागणी मान्य केली नाही म्हणून मोकळ्यात शौच करत आहेत अशा आशयाच्या बातम्या काही दिवसांखाली वेगवेगळ्या प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध झाल्या. या बातम्यांची कात्रणं, स्क्रीनशॉट्स आणि लिंक्स सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या.

ही घटना अत्यंत संतापजनक होती. त्यामुळे ती मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली. अनेक नावाजलेल्या वेबसाईट्सनी या घटनेला प्रसिद्धी दिली. मात्र, या माहितीची खातरजमा कोणीच केली नाही.

अमर उजाला

24सिटी.न्यूज :

हरिनायक :

एशियन नेट न्यूज :

तथ्य पडताळणी :

ही माहिती देशभरात व्हायरल झाली. यामुळे एकप्रकारे संतापाची लाट पसरली होती. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून सहारनपूर पोलिसांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले. रामपूर मनिहारान पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये अशी कोणतीही घटना घडली नसल्याचं समोर आलंय.

व्हायरल माहितीचं पूर्णपणे खंडन करत ही चुकीची असल्याचं सहारनपूर पोलिसांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे विविध प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातम्या आणि सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या माहितीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.

https://twitter.com/saharanpurpol/status/1246751571909562369?s=19

निष्कर्ष :

तब्लिकी जमातमधील लोक आरोग्य कर्मचाऱ्यांशी केलेलं गैरवर्तन, नॉनव्हेजची मागणी, मोकळ्यात शौच अशी कोणतीही घटना सहारनपुरमध्ये घडलेली नाही. पोलिसांनी केलेल्या चौकशीत हे स्पष्ट झालंय. याविषयी प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध बातम्या, सोशल मीडियावर व्हायरल असलेले मेसेज तथ्यहीन आहेत. त्यावर विश्वास ठेवू नये.

Updated : 6 April 2020 11:18 AM GMT
Next Story
Share it
Top