Fact Check: महाराष्ट्रात भाजपचे 12 हून अधिक आमदार फुटणार?

819

सध्या सोशल मीडियावर भाजपचे 12 हून अधिक आमदार फुटणार? महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप? असे मेसज व्हायरल होत आहे.

या संदर्भात मॅक्स महाराष्ट्रच्या फॅक्ट चेक टीम ने पडताळणी केली असता, महाराष्ट्रात 12 आमदार फुटणार… हे वृत्त tv9 मराठी या वृत्तवाहिनीने दिलं असल्याचं समोर आलं. तसंच व्हायरल झालेले स्क्रीन शॉट देखील खरे असल्याचं समोर आलं आहे.

मात्र, हे वृत्त सध्याचे नसून tv9 Marathi या मराठी वृत्तवाहिनीने Economics Times च्या हवाल्याने 4 डिसेंबर 2019 लाच हे वृत्त प्रसारीत केलं होतं. त्यामुळं 2019 चं हे वृत्त असून हे वृत्त सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे.

(सौजन्य TV9) 

Comments