Home > Fact Check > Fact Check: देवेंद्र फडणवीस यांना खोटी आकडेवारी मान्य आहे का...??

Fact Check: देवेंद्र फडणवीस यांना खोटी आकडेवारी मान्य आहे का...??

Fact Check: देवेंद्र फडणवीस यांना खोटी आकडेवारी मान्य आहे का...??
X

चुकीचं ट्वीट केल्याबद्दल आणि वरिष्ठ पत्रकार कमलेश सुतार यांना धमकी दिल्याबद्दल ट्रोल झालेल्या कंगना राणावत यांना आपलं ट्वीट डिलीट करावं लागलं होतं. या संदर्भात मॅक्समहाराष्ट्राचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी फेसबूकवर पोस्ट लिहित. शिवसेनेने यातून धडा शिकायला हवा. शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ असते. या म्हणीचा आधार घेत शिवसेनेला सल्ला दिला होता.

त्यानंतर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेश चिवटे यांनी शक्ती पेक्षा युक्तीचा वापर करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा आकडेवारीसह फोल ठरवला आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात 21 लाख रुग्णांना 1500 कोटींची मदत केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, खरी वस्तुस्थिती मंगेश चिवटे यांनी आकडेवारीसह समोर आणली आहे. मंगेश चिवटे यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी केंद्र सुरु करण्याचे श्रेय त्या मंगेश चिवटे यांनी फेसबूकवर पोस्ट लिहित सत्यता समोर आणली आहे.

काय म्हटलंय मंगेश चिवटे यांनी...

खोटी आकडेवारी माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांस मान्य आहे का...??

माजी मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब यांच्या कार्यकाळात 21 लाख रुग्णांना 1500 कोटींची मदत केल्याचा दावा केला जातोय.

प्रत्यक्षात

21 लाख रुग्णांना नव्हे तर 54 हजार रुग्णांना केली गेली मदत

1500 कोटी नव्हे तर 526 कोटींची केली गेली मदत

5 वर्षांत एकूण मदतीसाठी आलेले एकूण अर्ज - 86,689

5 वर्षात एकूण मदत मान्य केलेले अर्ज - 53,762

5 वर्षांत एकूण झालेली मदत - 526 कोटी रुपये

राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब गोरगरीब रुग्णांप्रति संवेदनशील होते का..?? तर नक्कीच होते...म्हणूनच त्यांनी माझ्या सुमारे 4 महिन्याच्या पाठपुराव्यानंतर तात्काळ मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष स्थापन करण्यास मान्यता दिली होती..( यासाठी नोव्हेंबर 2014 ते फेब्रुवारी 2015 असा सातत्याने पाठपुरावा केला होता.याकामी मला श्री फडणवीस साहेब यांचे तत्कालीन सहकारी श्री परिणय फुके आणि स्विय सहाय्यक श्री सुमित वानखेडे यांनी प्रामाणिक मदत करत वेळोवेळी श्री फडणवीस साहेब यांच्या भेटी घडवून आणल्या..)

तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्यांच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात तब्बल गरजू 21 लाख रुग्णांना 1500 कोटी रुपये मदत वितरित केली गेली असल्याची खोटी माहिती नाटकीय पद्धतीने रडत रडत सांगितली जात आहे...हा अभिनय पाहून साक्षात अलका कुबल देखील लाजल्या असतील...कारण त्यांच्यापेक्षाही सुंदर रडण्याचा अभिनय ही व्यक्ती करत आहे..

असो, मी या ठिकाणी देत असलेली माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या, वेबसाईटवर आहे...कोणीही अभ्यासू नागरिक / पत्रकार याची खात्री करू शकेल...

जाता जाता -

21 लाख रुग्णांना 5 वर्षात मदत म्हणजे

सरासरी 1 वर्षात 4 लाख 20 हजार रुग्णांना मदत

1 वर्षात शासकीय कामकाजाचे दिवस 300 दिवस गृहीत धरले तर 1 महिन्याला 42 हजार रुग्णांना मदत केली गेली आहे...

एकूण 5 वर्षात सुमारे 54 हजार रुग्णांना मदत केली गेली असल्याचे आकडेवारी पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते...म्हणजे 2 दिवसांतच 5 वर्षांचा कार्यकाळ या ठिकाणी पूर्ण केलाय...

झूठ बोले , कौआ काटे...

ता. क.

आदरणीय रवी सर,

आपण परवाच सांगितले होते...पुराव्यानिशी शाबीत करा...

शक्ती पेक्षा , युक्ती मोठी...

Updated : 2020-10-08T18:08:28+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top