Top
Home > Fact Check > इंदुरीकर महाराज भाजपातून निवडणूक लढवणार ?

इंदुरीकर महाराज भाजपातून निवडणूक लढवणार ?

इंदुरीकर महाराज भाजपातून निवडणूक लढवणार ?
X

येत्या विधानसभा निवडणुकीत किर्तनकार इंदुरीकर महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. संगमनेर येथे मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या स्टेजवर इंदुरीकर यांनी हजेरी लावली. या नंतर इंदुरीकर संगमनेर विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना टक्कर देणार अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.

ahmednagar-news/indurikar-maharaj-likely-to-join-bjp-and-contest-maharashtra-assembly-election-from-sangamner-constituency

मात्र, या संदर्भात आम्ही आमचे अहमदनगरचे प्रतिनिधी रोहित वाळके यांच्याशी बातचित केली असता त्यांनी इंदुरीकर निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार नसल्याचं सांगितलं. भाजपच्या वतीनं या ठिकाणी मालपाणी यांच्या नावाची चर्चा सुरु असून इंदुरीकर महाराज यांची ही फक्त सदिच्छा भेट होती. यावेळी इंदुरीकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये मदत दिली. मात्र, इंदुरीकर निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार हे वृत्त सध्या तरी निराधार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Updated : 14 Sep 2019 2:26 PM GMT
Next Story
Share it
Top