Fact check ‘ती’ आज्जी सध्या कुठे आहे ?

Fact check ‘ती’ आज्जी सध्या कुठे आहे ?

गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडिया वरती व काही स्थानिक जिल्ह्यातील वृत्तपत्रांमध्ये व मीडियामध्ये सुपर आजीची पोस्ट व्हायरल होत आहे. ज्या कारणांमुळे सुपर आजीची पोस्ट व्हायरल होतेय, ती खरी की खोटी हे आम्ही फँक्ट चेकच्या माध्यमातून तपासून पाहिलंय.
मॅक्स महाराष्ट्र ने बुलढाणा जिल्ह्यातील थेट आजीचे घर गाठून खरं काय हे जाणण्याचा प्रयत्न केला आहे तर असे लक्षात आले आहे की खामगाव येथील सुपर आजी म्हणून देशभर प्रसिद्ध असलेल्या रेखा जोगळेकर ह्या घरीच सून त्या ह्या वर्षी कुठेही सायकल स्वारी करण्यासाठी निघालेल्या नाहीत कारण त्यांची तब्येत बरोबर नसल्यामुळे त्या घरीच आहेत. त्यामुळे त्यांच्या विषयीची ती व्हायरल पोस्ट खोटी असल्याचं सिद्ध झालं.