कांदिवलीत शॉक लागून चिमुरड्यांचा मृत्यू

कांदिवलीत शॉक लागून चिमुरड्यांचा मृत्यू

मुंबईः कांदिवली पूर्वेकडच्या पोईसर भागात लहान मुलांना शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. तुषार झा आणि ऋषभ तिवारी ही मुलं काल रात्री पाऊस पडत असल्यानं भिजण्यासाठी घराच्या बाहेर पडली. ही मुलं चाळीत राहत असल्यानं पावसात तिथे पाणी तुंबलं होतं. पावसाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या या लहानग्यांना अचानक शॉक लागला आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
तीन मुलांपैकी एका मुलाला स्वतःचा जीव वाचवण्यात यश आलं. त्यातच एक वायर तुटल्यानं ती चाळीतल्याच एका लोखंडी शिडीला चिकटली आणि या मुलांचा त्या शिडीतून आलेला शॉक लागून मृत्यू झाला. स्थानिकानीं या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्या घरातही करंट पास झाला होता. पोलीस पोहचेपर्यंत त्या मुलांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. कारण पोईसरमधल्या जनतानगरमध्ये चाळ सिस्टीम असल्यानं बहुतेकांच्या घराला अशा प्रकारची शिडी आहे.