मेगाभरती सुरू..

राज्यातील बेरोजगारांसाठीच्या मेगाभरतीची प्रतिक्षा सगळ्यांना आहे, मात्र त्याआधीच भारतीय जनता पक्षाची मेगाभरती सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या आधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये अधिकृत प्रवेश करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड. त्यांचा मुलगा आमदार वैभव पिचड, आमदार शिवेंद्रराजे भोसले, काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर, आमदार संदीप गणेश नाईक, चित्रा वाघ यांनी आज अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला.
प्रवेशाच्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, विनोद तावडे, राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.

Live : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांच्या प्रवेशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलणार..

Live : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांच्या प्रवेशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलणार..

Posted by Max Maharashtra on Tuesday, July 30, 2019