LIVE : ममता बॅनर्जी मला अजूनही दोन कुर्ते भेट म्हणून पाठवतात: मोदी

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अभिनेता अक्षय कुमार ने मुलाखत घेतली. या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबाबत बोलताना एक किस्सा सांगितला. ममता बॅनर्जी मला अजूनही वर्षाला दोन कुर्ते आणि बंगाली मिठाई भेट म्हणून पाठवतात. असं सांगत ऐन निवडणुकीच्या तापलेल्या राजकारणात आरोप प्रत्यारोप सुरु असताना, मोदींनी ममता बॅनर्जी आणि त्यांच्या वैयक्तिक सबंधाची माहिती देत राजकारणी लोकांचे राजकारणाच्या व्यतिरिक्त मैत्रीचे सबंध असू शकतात, याचे उदाहरण दिले तसंच यावेळी त्यांनी काँग्रेस नेते गुलामनबी आझाद यांच्यासोबतही मैत्रीपूर्ण सबंध असल्याचे देखील सांगितले.
 या मुलाखतीमध्ये त्यांनी राजकीय प्रश्नाऐवजी खासगी आयुष्याबाबत मनमोकळी उत्तरं दिली.
 बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना देखील मला वर्षातून तीन ते चार वेळा ढाका येथून मिठाई पाठवतात. ही गोष्ट जेव्हा ममता बॅनर्जींना समजली तेव्हापासून त्या देखील वर्षातून एक- दोनवेळा मिठाई पाठवू लागल्या, असे त्यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here