राष्ट्रवादीची भिस्त आता तरुणांवर…

लोकसभा निवडणुकांच्या निकालाचा आढावा घेण्यासाठी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या बलस्थानाबरोबरच निवडणुकीत पक्ष म्हणून राष्ट्रवादी पक्ष कुठे कमी पडला? य  याबाबत चर्चा केली.

यावेळी शरद पवार यांनी प्रत्येक उमेदवारांशी प्रत्यक्ष संवाद साधत आगामी विधानसभा संदर्भात उमेदवारांशी चर्चा केली. 

तरुणांना संधी…

 लोकसभा निवडणुकीत काय निकाल लागले ते डोक्यातून काढाआपला पक्ष लोकांच्या प्रभावीपणे समोर कसा येईलआपली विचारधारा लोक आपलीशी कशी करतीलहा एकच विचार आतात्यासाठी प्रयत्न कराआपण लोकसभा निवडणुकांप्रमाणे विधानसभेतही तरुण चेहऱ्यांना संधी देऊ.

एक वेळ अशी होती कीआपल्यासोबतचे ५८ लोक साथ सोडून गेले होतेसभागृहात आम्ही फक्त  जण होतोमात्र आम्ही मेहनत घेतली आणि पुन्हा ६० लोक सभागृहात आणलेत्यात सर्व नवे चेहरे होतेआजची निवडणुकीनंतरची परिस्थिती इतकी वाईट नाहीतुम्ही ४० लोक आहाततुमचा ४० लोकांचा एक संच आहेतुम्ही खंबीरपणे लढाअसं म्हणत पवारांनी पक्षातील नेत्यांसह उमेदवारांना विधानसभेच्या निवडणुकीसाठी नव्या दमानं कामाला लागण्याचा सल्ला दिला आहे.

 या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारप्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटीलराष्ट्रीय सरचिटणीस डीपीत्रिपाठी,ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचडज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळराष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरेविधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवारमाजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथीमाजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटीलखासदार सुप्रियाताई सुळेज्येष्ठ नेते  विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर,ज्येष्ठ नेते गणेश नाईकखासदार माजीद मेमन,राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खानविधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेराष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिकमहिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघमुंबई अध्यक्ष सचिन अहिरखासदार वंदना चव्हाण,खासदार डॉअमोल कोल्हेखासदार उदयनराजे भोसलेहसन मुश्रीफअनिल देशमुख,राजेश टोपेविदयार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटीलआदींसह पक्षाचे आमदारजिल्हाध्यक्षलोकसभा लढवलेले उमेदवारपदाधिकारी उपस्थित होते.