निवडणूकीची तयारी अंतिम टप्प्यात, निवडणूक आयोगाचं पथक उद्या मुंबईत

Courtesy : Social Media
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून निवडणूकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक उद्या मुंबईत पोहोचणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी करायची तयारी, मतदार याद्या, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तयारी, संवेदनशील मतदारसंघांची यादी, खबरदारीच्या उपाययोजना अशा बाबींवर निवडणूक आयोगाच्या तीन आयुक्तांचं पथक मुंबईत येऊन विविध अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.