भाजपा आघाडीला १७७ जागा मिळणार आहेत का?

भाजपा आघाडी म्हणजेच एनडीए ला १७७ जागा मिळतील, तर काँग्रेस आघाडीला १४१ तसंच इतर २२४ जागांवर विजय मिळवतील असा इंडीया टुडेचा सर्वे सांगतो अशा आशयाच्या पोस्ट इंडीया टुडेच्या राहुल कंवल यांच्या व्हिडीयो फुटेज सह व्हायरल आहेत. या व्हिडीयोच राहुल कंवल त्यांच्या इलेक्शन डॅश बोर्ड ची माहिती देत असताना ग्राफिक्स आर्टीस्ट त्यांना निवडणूक निकालाचं पान कॉम्प्युटर वर ओपन करतात. त्यात जे ग्राफिक्स आहे. त्यामध्ये वरील सांगीतल्याप्रमाणे आकडे असलेलं ग्राफिक्स दिसतं.

इंडीया टुडे ची ही व्हिडीयो क्लिप खरी आहे, त्यात कसलाही बनाव नाही. मात्र जी आकडेवारी त्या व्हिडीयो मध्ये दिसत आहे ती आकडेवारी डमी आहे. एक्झिट पोलचा प्रोमो शूट करत असताना निकाल कसे दाखवले जाणार आहेत हे सांगताना ती स्क्रीन दाखवली गेली. मात्र हे आकडे खरे नसल्याचं इंडीया टुडे ने स्पष्ट केलं आहे.