Home > Election 2020 > सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर
X

अखेर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणुक होईल. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. विधानसभा निवडणुकांसोबतच या जागेसाठी पोटनिवडणूक होईल अशी अपेक्षा होती. मात्र विधानसभेच्या तारखा जाहीर करताना निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीबाबत काही भाष्य केलं नव्हतं. त्यामुळे संभ्रम आणि नाराजीचं वातावरण तयार झालं होतं. यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं होतं.

अखेर निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी करत सातारा लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. विधानसभा निवडणुकी प्रमाणेच २१ ऑक्टोबर रोजी साताऱ्यामध्ये लोकसभेसाठीही मतदान होईल आणि २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.

Updated : 24 Sep 2019 7:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top