Home > Election 2020 > मुख्यमंत्र्यांच्या पीएला तिकीट, खडसेंचं मात्र पहिल्या यादीत नाव नाही

मुख्यमंत्र्यांच्या पीएला तिकीट, खडसेंचं मात्र पहिल्या यादीत नाव नाही

मुख्यमंत्र्यांच्या पीएला तिकीट, खडसेंचं मात्र पहिल्या यादीत नाव नाही
X

भारतीय जनता पक्षाने जारी केलेल्या पहिल्या यादीत माजी महसूल मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं नाव नाहीय. मात्र या यादीत मुख्य़मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पीए अभिमन्यू पवार यांचं मात्र नाव झळकलं आहे. पहिल्या यादीत नाव नसतानाही खडसे यांनी मुक्ताईनगर येथून आपला अर्ज दाखल करायचा निर्णय घेतला आहे.

विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या सत्रात एकनाथ खडसे यांनी आपल्या वरील आरोपांना उत्तरं देताना कदाचित पुढच्या सभागृहात आपण असू नसू मात्र सार्वजनिक जीवनात आपण अशा पद्धतीने कलंक घेऊन जगू शकत नाही असं म्हणत त्यांच्या विरोधात पक्षांतर्गत नाराजीचा विषयच चव्हाट्यावर आणला होता. पाहा व्हिडीओ...

https://youtu.be/fR7hCHLI1XI

Updated : 1 Oct 2019 8:23 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top