Home > Election 2020 > मला आमदार का व्हायचंय? : 'आप' उमेदवार संदीप सोनावणे

मला आमदार का व्हायचंय? : 'आप' उमेदवार संदीप सोनावणे

मला आमदार का व्हायचंय? : आप उमेदवार संदीप सोनावणे
X

पर्वती मतदार संघात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आम आदमी पक्ष अशी तिहेरी लढत होणार आहे. या मतदारसंघातून भाजपच्या शहराध्यक्ष आणि या पूर्वी दोन वेळा निवडून आलेल्या माधुरी मिसाळ आता तिसऱ्यांदा निवडणूकीच्या रिंगणात आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने येथे महापालिकेच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्‍विनी कदम यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे दोन महिलांमधील लढत चुरशीची झाली आहे. तर 'आप'ने या मतदारसंघात संदीप सोनावणे यांना उमेदवारी दिली आहे.

आम आदमी पक्षाचे उमेदवार संदीप सोनावणे यांनी 'मला आमदार का व्हायचंय?' मध्ये बातचीत करताना, “आत्तापर्यंत दिल्लीमध्ये जी विकासकामं केली आहेत तशीच काम महाराष्ट्रात देखील करणार आहोत, म्हणून आम आदमी पक्षाच्या उमेदवारांना जनता निवडून देतील." असा विश्वास दर्शवला आहे.

https://youtu.be/zcoaP2shuyQ

Updated : 16 Oct 2019 4:54 PM GMT
Next Story
Share it
Top