मोदींच्या मंचावर खडसेंना कोणी केलं वंचित

मोदींच्या मंचावर खडसेंना कोणी केलं वंचित

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिक इथं महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याच्या निमित्तानं सभा झाली. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुंगटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे, दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह मंत्री गिरीश महाजन यांनी प्रस्ताविकात आपले विचार मांडले. मात्र, मंचावर पहिल्या रांगेत उपस्थित असणाऱ्या भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे भाषण झालं नाही. त्यामुळं त्यांना बोलण्याची संधी दिली नाही का? की त्यांनी स्वत: हून बोलायला नकार दिला अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.
दरम्यान या संदर्भात आम्ही एकनाथ खडसे यांच्याशी फोन वरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही.