कोकणात पूर्व मोसमी सरींचा इशारा

कोकणात पूर्व मोसमी सरींचा इशारा

कोकणात बहुतांश ठिकाणी येत्या २४ तासांत वादळी वाऱ्यांसह पूर्वमोसमी पावसाच्या जोरदार सरी कोसळतील. याबरोबरच उत्तर मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी जोरदार पूर्वमोसमी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. नैऋत्य मोसमी वारे गुरुवार (१३ जून) पर्यंत तळकोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागांत दाखल होण्याची शक्यता आहे.
पावसाचा इशारा
१२ जून : कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
१३ ते १४ जून : कोकण, गोव्यात बहूतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
१५ जून : कोकण, गोव्यात अनेक ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.