Home News Update मुंबईतील ‘इस्टर्न फ्री वे’ ला विलासराव देशमुख यांचे नाव

मुंबईतील ‘इस्टर्न फ्री वे’ ला विलासराव देशमुख यांचे नाव

मुंबईतील ‘इस्टर्न फ्री वे’ मार्गाला माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील कार्यवाही सुरु करण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नगरविकास विभागाला दिली आहे.
राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा आणि महसुलवाढीसंदर्भात परिवहन विभागाची बैठक आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. यावेळी वित्त, परिवहन विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिवंगत विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री म्हणून मुंबईच्या विकासाला दिशा दिली. तसंच ‘इस्टर्न फ्री वे’च्या उभारणीत त्यांचं योगदान लक्षात घेऊन ‘इस्टर्न फ्री वे’ला त्यांचं नाव देण्यात यावं, अशी सूचना अजित पवार यांनी दिली आहे.
एसटी महामंडळाच्या शिवशाही बसगाड्यांचे होणारे अपघात व नागरिकांमध्ये त्याबद्दल असलेल्या नाराजीची दखल घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश देखील यावेळी देण्यात आले. वाहन अपघात रोखण्यासाठी मोटार वाहतूक कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना देखील पवार यांनी परिवहन विभागाला दिल्या.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997