वंचित किंवा ईव्हीएम मुळे विजयी झालो नाही – चंद्रकांत पाटील

वंचित किंवा ईव्हीएम मुळे विजयी झालो नाही – चंद्रकांत पाटील

भारतीय जनता पक्षाने मुलभूत कामे केली म्हणून आम्ही विजयी झालो. 1 कोटी 6 लाख सदस्य संख्या असलेला हा पक्ष आहे, याच संघटनेच्या जोरावर आम्ही अब की बार 220 पार निघून जाऊ, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. वंचित किंवा ईव्हीएम मुळे आम्ही विजयी झालेलो नाही असं ही चंद्रकांत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या विशेष कार्यसमितीच्या बैठकीत म्हटलं.

शिवसेना-भाजपा युती बाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. शिवसेनेला बरोबरीच्या जागा का द्याव्यात असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. शिवसेना-भाजपा विचारधारेने एक आहोत. 288 जागांची तयारी मात्र करा, एकत्र लढायचं आहे, मात्र सहयोगी पक्षाचे उमेदवार ही निवडून आले पाहिजेत. सत्तेत यायचं झालं तर सहयोगी पक्ष ही निवडून आले पाहिजेत. कुणाला कुठल्या जागा मिळतील याचं नियोजन देवेंद्र फडणवीस करतील. त्यामुळे आपण सर्व 288 जागांवर काम केलं पाहिजे. असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांना कधी आपण टेन्शन मध्ये पाहिलंय का. मराठा आंदोलन, धनगर आंदोलन, तसंच इतर आंदोलनांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी कधी कच खाल्ली नाही. त्यांचा टेन्शन मधला फोटो कधी आपण पाहिला आहे का..

दैवी शक्ती ज्यांच्याकडे आहे असा नेता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दैवी शक्ती असलेला नेता आहे, असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. सध्या निम्मी निम्मी खात्याची चर्चा आहे, निम्मी निम्मी खाती ठरवू द्या त्यांना, आपण बूथ वर काम करू. असा संदेश पाटील यांनी केला.

बाहेरच्यांची चिंता..

बाहेरून आलेल्यांमुळे आपलं महत्व कमी होईल अशी चिंता कार्यकर्त्यांना वाटतेय, पण 122 मध्ये 15-20 बाहेरचे येतील, पण सध्या मंत्रिमंडळात कोण आहेत,आपलेच कार्यकर्ते आहेत. असं बोलून कार्यकर्त्यांची चिंता दूर करण्याचा प्रयत्न चंद्रकांत पाटील यांनी केला.