Home News Update कोरेगाव भीमा प्रकरणातील गुन्हे मागे घ्या : निखिल वागळे

कोरेगाव भीमा प्रकरणातील गुन्हे मागे घ्या : निखिल वागळे

Support MaxMaharashtra

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यात सत्तेची सूत्र हाती घेताच मेट्रोच्या कारशेडला स्थगिती आरे आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे रद्द करण्याचे आदेश प्रशासनाला दिले, त्याचबरोबर आरेच्या कारशेडला देखील स्थगिती दिली. नाणार प्रकल्पातील आंदोलकांचे गुन्हे देखील मागे घेण्यात आले आहेत.

त्यानंतर आता मराठा क्रांती मोर्चातील गुन्हे देखील मागे घेण्याची तयारी सरकारने दाखवली आहे. मराठा क्रांती मोर्चो सोबतच कोरेगाव भीमा प्रकरणातील आंदोलकांचे देखील गुन्हे मागे घेण्याची मागणी आता समोर येत आहे. या संदर्भात आज मुंबईत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे,(Nikhil Wagle)  ज्येष्ठ वकील संजय संघवी,(Sanjay Sanghvi) कामगारांसाठी लढा देणारे विश्वास उटगी यांच्यासह, लेखक आणि सामाजिक कार्यकर्त्या उर्मिला पवार उपस्थित होत्या.

यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या या सर्वांनी कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपींवरील गुन्हे मागे घेण्याची विनंती उद्धव ठाकरे यांच्या सरकारला केली आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या भूमिकेवरच प्रश्न चिन्ह उपस्थित केले.

हे ही वाचा…

शरद पवारांच्या यशाचं रहस्य – राजदीप सरदेसाई
पंकजा मुंडेचं अखेर ठरलं…!
किरीट सोमय्या पुन्हा उध्दव ठाकरेंवर बरसले कोर्टात काय उत्तर देणार सरकार

सरकार under the Unlawful Activities Prevention Act च्या नावावर अशा प्रकारे लोकांवर अन्याय करु शकत नाही. एक नागरिक म्हणून या प्रकरणात नक्की काय झालं आहे. हे जाणून घेण्याचा आमचा अधिकार आहे. ही या सरकारची दडपशाही आहे. असं म्हणत फडणवीस सरकारच्या भूमिकांवर निखिल वागळे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

यावेळी उद्धव ठाकरे यांच्या सरकारने सुरेंद्र गाडलींग, सुधीर ढवळे, रोना विल्सन, शोमा सेन आणि महेश राऊत, वरवरा राव, सुधा भारद्वाज या सारख्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची विनंती ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केली. या संदर्भात एक डिलिगेशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997