Home Fact Check Fact Check : राहुल गांधींनी इम्रान खान यांच्यासोबत बिर्याणी खाल्ली का?

Fact Check : राहुल गांधींनी इम्रान खान यांच्यासोबत बिर्याणी खाल्ली का?

320
0
Did Imran Khan meet Rahul Gandhi over biryani?

ये इम्रान मियां के साथ चिकन बिर्यानी कौन खा रहा है? ….या मजकुरासह भाजपा युवा मोर्चाच्या दिल्ली प्रदेश कार्यकारिणी सदस्य अखिलेश मिश्रा याने १९ एप्रिल, २०१९ रोजी फेसबुकवर एक फोटो शेअर केला.

Fact Check: विनाअनुदानित शाळांचा ‘कायम’ शब्द कुणी काढला?

Support MaxMaharashtra

Fact Check : बांग्लादेशी टका आणि पाकिस्तानी रूपयाने भारतीय रूपयाला मागे टाकलं?

या फोटोत पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान आणि काँग्रेस नेता राहुल गांधी एका टेबलावर एकत्र जेवताना दिसताहेत.‌ अर्थात, अशा प्रकारचे फोटो खरे असतीलच, याची शाश्वती नसते. पण कुठलीही गोष्ट तपासून न बघताच ती पसरवत राहण्याचा मोठा आजार नेटकऱ्यांमध्ये आहे. त्याच आजाराच्या प्रभावाखाली इम्रान खान आणि राहुल गांधींचा एकत्र जेवतानाचा फोटो प्रसारित करण्यात आला, पण तो बनावट आहे.‌

यात दोन फोटो एकत्र केले गेलेत. एक आहे, इम्रान खान आणि त्यांची पत्नी रेहम खान एकत्र भोजन करतानाचाआणि दुसरा कर्नाटकात इंदिरा कॅन्टीनचं उद्घाटन राहुल गांधींच्या हस्ते झालं तेव्हाचा. इम्रान खानच्या फोटोत रेहम खान यांच्या जागी राहुल गांधींचा फोटो तांत्रिक करामती करून चिकटवण्यात आलाय.

इम्रान खान यांचा फोटो २०१५ मध्ये पाकिस्तानातील तत्कालीन मंत्री फैजल वावडा यांच्या निवासस्थानी सेहरी वेळचा म्हणजे रमजान काळात सुर्योदयापूर्वीच्या न्याहरीचा आहे.‌ पत्रकार खलीद खी यांनी तो ६ जुलै, २०१५ ला ट्वीट केलाय.

<

/h5>

राहुल गांधींचा फोटो कर्नाटकात १६ ऑगस्ट, २०१७ रोजी इंदिरा कॅन्टीनच्या उद्घाटनप्रसंगीचा आहे. द हिंदू त तो पाहायला मिळतो.

इम्रान खान यांच्या फोटोतील टेबलावर मांडलेले पदार्थ, रेहम खान यांच्या डाव्या बाजूला उभी असलेली व्यक्ति, बसलेल्या व्यक्तिचा हात, समोर बसलेल्या व्यक्तिचा हात आपल्याला बनावट फोटोत जसंच्या तसं पाहायला मिळतं. राहुल गांधींच्या मूळ फोटोतील समोरील दोन पाण्याच्या बाटल्या व प्लेट बनावट फोटोत दिसतात.‌

राहुल गांधींच्या मूळ फोटोतील डावीकडील व्यक्तिचा हात बनावट फोटोतही राहुल गांधींच्या हातावर उरलेला दिसतो, तर इम्रानच्या कुर्त्याच्या डाव्या बाहीवर दिसणारी बोटं राहुल गांधींच्या मूळ फोटोतील सिध्दारामय्या यांची आहेत. इम्रान आणि राहुल दोघांच्या प्लेट वेगवेगळ्या आहेत. शिवाय, राहुल गांधी चिकन बिर्याणी नव्हे तर वांगीभात खात आहेत.

यावरून एक स्पष्ट होतं की, इम्रान खान आणि राहुल गांधी यांचा एकत्र जेवतानाचा फोटो बनावट असून, तो दोन वेगवेगळ्या घटनांतील फोटो एकत्र जुळवून लोकांची दिशाभूल करण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे..


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997