धोबी समाजाचं उपोषण

धोबी समाजाचं उपोषण

238
0
Dhobi community hunger strike , धोबी समाजाचं उपोषण, max maharashtra
महाराष्ट्रातील धोबी समाजाला १९५७ पूर्वी असल्याप्रमाणे व देशात १७ राज्ये व ५ केंद्रशासित प्रदेशात असलेल्या अनुसूचित जातीचे (एस.सी.) आरक्षण पूर्ववत लागू व्हावे म्हणून धोबी समाजातर्फे बेमुदत उपोषण पुकारण्यात आले आहे. गेल्या तीस वर्षापासून आरक्षणाचा हा मुद्दा प्रलंबित असून येत्या 19 जुलै रोजी या प्रश्नासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.
Dhobi community hunger strike , धोबी समाजाचं उपोषण, marathi news, max maharashtraराज्यातील धोबी समाजाने पूर्ववत आरक्षणाच्या मागणीसाठी सातत्यपूर्ण लढा चालवल्यानंतर १९९२ मध्ये तत्कालीन मंत्री डॉ. दशरथ भांडे यांच्या अध्यक्षतेखालील अभ्यास समितीने राज्यातील धोबी समाज अस्पृश्यतेचे निकष पूर्ण करीत असल्याने व भारतातील इतर राज्यात धोबी जातीला अनुसूचित जातीच्या सवलती मिळत असल्याने महाराष्ट्रात सुद्धा धोबी समाजाला अनुसूचित जात प्रवर्गाच्या यादीत समाविष्ठ करण्याची स्वयंस्पष्ट शिफारस असलेला अहवाल शासनाकडे सादर केला होता.
धोबी समाजाला आरक्षण मिळावं असा अहवाल येऊनही तब्बल १७ वर्षांपासून हा अहवाल शासनदरबारी धुळखात पडून आहे. वारंवार आंदोलने,निवेदने व मोर्चे काढून दरवेळी फक्त आश्वासन देऊन धोबी समाजाला न्यायापासून वंचित ठेवण्यात आलं आलं, विद्यमान फडवणीस सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय ज्या पद्धतीने घेतला त्याच प्रमाणे धोबी समाजाच्या आरक्षणाचा निर्णय ही तात्काळ घ्यावा अशी मागणी धोबी समाजने केली आहे.
धोबी समाजाला अनुसूचित जातीच्या सवलती लागू व्हाव्यात म्हणून डॉ. दशरथ भांडे समितीचा अहवाल केंद्राला पाठवण्यात यावा ही धोबी समाजाची मुख्य मागणी मान्य व्हावी यासाठी धोबी समाजाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष विवेक ठाकरे यांनी येत्या १९ जुलै पासून प्राणांतिक उपोषण पुकारण्याचा इशारा दिला आहे. बेमुदत चालणाऱ्या या आंदोलना दरम्यान दररोज समाज संघटनेच्या विविध फ्रंटलचे १ हजार लोक साखळी उपोषण करून आंदोलनाला पाठिंबा देणार आहे