नांदेडमध्ये योगा लातुरात जमीन

नांदेडमध्ये योगा लातुरात जमीन

योग गुरू रामदेव बाबा यांना लातुर मध्ये बाजारभावापेक्षा कमी दरात जमीन देण्याचं महाराष्ट्र सरकारने ठरवलं आहे. काहीच दिवसांपुर्वी नांदेड मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदेव बाबांसोबत योगा केला होता.

त्यानंतर रामदेव बाबांना सरकारने जमीन घेण्यासाठी आमंत्रित केलं आहे.  रामदेव बाबा यांना याआधी नागपूर मध्ये सरकारने जमीन दिली आहे. मात्र या जमीनीचा वापर सुरू झालेला नाही. रामदेव बाबा यांच्या पतंजलि समुहाचा विस्तार देशभर वाढत आहे, अशा वेळी त्यांच्या या उद्योग समूहामुळे राज्यात रोजगार निर्मिती होईल असा विश्वास सरकारला वाटत आहे.

लातूर मध्ये सोयाबीन प्रक्रीया उद्योग उभारावा यासाठी 400 एकर जागा सरकारने देऊ केली आहे. 2013 मध्ये BHEL च्या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांकडून जमीनीचं अधिग्रहण करण्यात आलं होतं. हीच जमीन रामदेव बाबा यांना देण्यात येणार आहे, असं एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.