धरणक्षेत्रातील अतिरिक्त जमिनींचा विकास खासगी-सार्वजनिक तत्त्वातून 

धरणक्षेत्रातील अतिरिक्त जमिनींचा विकास खासगी-सार्वजनिक तत्त्वातून 

राज्यातील सिंचनाचा विकास होण्याआधी जलसंपदा विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या अतिरिक्त जमिनींचा विकास करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. राज्यातील धरणक्षेत्राच्या जवळ असणाऱ्या अतिरिक्त जमिनींचा विकास करण्यात येणार आहे. यामध्ये विश्रामगृहे, रिक्त वसाहती सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या तत्त्वावर विकास कऱण्यासाठीचं धोऱण निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विकास प्रकल्पातून उभारला जाणारा निधी सिंचन प्रकल्पांच्या देखभालीसाठी वापरण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.