राहुल गांधींसाठी कार्यकर्त्यांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा

राहुल गांधींसाठी कार्यकर्त्यांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा

लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाची जबाबदारी स्विकारत राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, राहुल गांधींनी अध्यक्षपदी कायम राहावे, या मागणीसाठी बिहारमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे. बिहारमधील काँग्रेसच्या १२ कार्यकर्त्यांनी ११ जुलै रोजी दुपारी १ वाजता आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. सध्या राहुल गांधी बिहारच्या दौ-यावर आहेत.