Home News Update उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच

उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच

courtesy - social media
Support MaxMaharashtra

विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेस(Congress) आमदार नाना पटोले (Nanabhau  Patole) यांचं नाव घोषित करण्यात आलं आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)  यांनी ही घोषणा केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य असलेले नाना पटोले विधानसभा अध्यक्ष होतील, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा…

कॉंग्रेस राष्ट्रवादीमध्ये उपमुख्यमंत्री पदाचा तिढा कायम?
संजय राऊत यांच्या कसोटीचा दिवस
विश्वासदर्शक ठरावासाठी महाराष्ट्र विधानसभेची बैठक

त्यामुळे सकाळ पासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री पदावरून सुरू असलेला वाद अखेर संपुष्ठात आला आहे. कॉंग्रेसकडे विधानसभा अध्यक्ष पद तर राष्ट्रवादी कडे उपमुख्यमंत्री पद असं गणित आघाडीमध्ये ठरलं होतं.

मात्र काही सदस्यांनी उपमुख्यमंत्री पद काँग्रेसकडं घेण्याचा आग्रह धरला होता. मात्र, बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून आमदार नाना पटोले यांची घोषणा केल्याने उपमुख्यमंत्री पद राष्ट्रवादी कडेच असल्याचं स्पष्ट झालं आहे.


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997