Home News Update दिल्ली समोर झुकणार नाही – संजय राऊत

दिल्ली समोर झुकणार नाही – संजय राऊत

Support MaxMaharashtra

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परीषद घेत भाजपाला धारेवर धरलं. भाजपचा राज्यात राष्ट्रपती राजवट लागु करण्याचा डाव आहे. राज्यातील १३ व्या विधानसभेचा कार्यकाळ ९ नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे आता लवकरात लवकरात सत्ता स्थापन करणं गरजेच आहे तसं न झाल्यास राज्यपाल ज्या पक्षाकडे संख्याबळ जास्त असेल त्यांना सत्ते स्थापनेसाठी निमंत्रीत करु शकतात.

आमच्यासाठी प्रत्येक दिवस महत्वाचा आहे. त्यामुळे केव्हा काय करायचं ते आम्हाला माहीती आहे. नितीन गडकरी मुंबईला येताय म्हणून भेट घेतील की, नाही विचारले असतां संजय राऊत म्हणाले नितीन गडकरी यांच वरळीला घर आहे. घरी येत असतील, असं मिश्कीलपणे उत्तर संजय राऊत यांनी दिले. त्याचप्रमाणे पुढे संजय राऊत म्हणाले “भाजपाचा कर्नाटक पॅर्टन राबवण्याचा डाव राज्यात सुरु आहे.”  “काळजीवाहू म्हणून बसायचे आणि जागेवरुन सुत्र हलवायचे” असा टोला संजय राऊत यांनी लगावला. आम्ही दिल्ली समोर झुकणार नाही असं यावेळी संजय राऊत यांनी आपलं मत पत्रकार परिषदेत व्यक्त केलंं.


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997