पाकिस्तानमध्ये दूध १८० रुपये लिटर

पाकिस्तानमध्ये दूध १८० रुपये लिटर

पाकिस्तानातील लोकांना दूधही प्यायला मिळेनासे झालंय. पाकिस्तानात महागाई गगनाला भिडली आहे. आणि पाकिस्तान भारताला युद्धात हरवण्याचं दिवसा स्वप्न पाहतंय. मात्र वास्तव काही वेगळे आहे. पाकिस्तानामधील लोक दूध किती रुपयांना विकत घेते माहित आहे का?
हे माहित पडल्यावर आपल्याला आश्चर्य वाटायला नको. पाकिस्तानात १ लिटर दुधासाठी १८० रुपये खर्च करावे लागतात. कराची डेयरी फार्मर्स एसोसिएशनने अचानक दुधाच्या किंमतींत वाढ केली आहे. डेयरी फार्मर्स एसोसिएशनने दुधाच्या किमतीत २३ रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे खुल्या बाजारात दुधाची किंमत १८० प्रति लिटर झाली आहे. तर भारतात ५० ते ५५ रुपये लिटर दूध मिळतेय.