Home News Update Corona Virus : महाराष्ट्रात आढळले सहा संशयित रुग्ण

Corona Virus : महाराष्ट्रात आढळले सहा संशयित रुग्ण

Support MaxMaharashtra

चीनमध्ये कोरोना विषाणू चा (Corona Virus) उद्रेक सुरू आहे. चीनशिवाय जपान, दक्षिण कोरिया, थायलंड या देशांमध्येही काही रुग्ण आढळले आहेत. भारतात या विषाणूंचा प्रसार होऊ नये म्हणुन १८ जानेवारीपासून देशभरातील सात विमानतळांवर बाधित भागातील प्रवाशांचे स्क्रिनिग सुरू करण्यात आलं आहे. आतापर्यंत १७३९ प्रवाशांचं स्क्रिनिग झालं आहे. यात कोरोना विषाणूचे सहा संशयित प्रवासी आढळले असून हे प्रवासी महाराष्ट्रातील असल्यामुळे चिंतेच वातावरण निर्माण झालं आहे.

महाराष्ट्रात सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई विमानतळावर प्रवाशांच स्क्रिनींग केलं जातय. संबंधित संशयितांमध्ये  तीन प्रवासी पुणे आणि तीन प्रवासी मुंबईतील आहेत. आरोग्य विभागाकडून या सर्व प्रवाशांचं त्यांच्या राहत्या घरी निरीक्षण केलं जाणार आहे. मुबंईतील दोघांना सौम्य सर्दी खोकला आढळला म्हणुन मुंबईतील  कस्तुरबा रुग्णालयात भरती केलं आहे. तर उर्वरित प्रवाशांमध्ये कोरोना विषाणूची काही लक्षण आहेत का याची तपासणी केली जाणार आहे. राष्ट्रीय जैविक संस्थान (NIB) द्वारा ही तपासणी आणि रोगाच्या निदानाची व्यवस्था केली जाणार आहे.

हे ही वाचा..

“कोरोना विषाणूविषयी काळजी घेणं गरजेच आहे. मात्र कोणीही घाबरून जाऊ नये. या विषाणूचा एकही रुग्ण अद्याप देशात आढळला नाही. यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज आहेत” असं राज्य सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी म्हटलं आहे.

“कोरोना या रोगामध्ये श्वसनसंस्थेचे आजार उद्भवतात. सर्दी, खोकला, छातीत दुखणं अशी लक्षण या रोगामध्ये दिसून येतात. हा आजार प्राणिजन्य आहे मात्र हा कोणत्या प्राण्यांपासून आला याची माहिती मिळाली नाही. त्यामुळे घाबरून न जाता काळजी घेणं गरजेच आहे.” असंही आवटे यांनी सांगितलं.

Corona Virus : महाराष्ट्रात आढळले सहा संशयित रुग्ण

कोरोना विषाणूचे सहा संशयित प्रवासी भारतात आढळले असून हे प्रवासी महाराष्ट्रातील असल्यामुळे चिंतेच वातावरण निर्माण झालं आहे. या विषाणूविषयी राज्य सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. पाहा व्हिडाओ…#MaxMaharashtra

Maxmaharashtra द्वारा इस दिन पोस्ट की गई शुक्रवार, 24 जनवरी 2020

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997