Home मॅक्स ब्लॉग्ज इंटरनेटवरच्या विद्वेषाबाबत संवाद

इंटरनेटवरच्या विद्वेषाबाबत संवाद

64
0
सोशल मीडियाचा संदेशवहन हा नवीन प्रकार आहे. डिजिटल आणि एकदम वेगवान! सर्वच प्रकारच्या संदेशवहनासाठी सोशल मीडिया हे एक निर्णायक साधन मानले जात आहे. सोशल मीडियाच्या कल्पक वापरामुळे आपत्कालीन संदेश, एकजूट निर्मिती, एलजीबीटीक्यूआयए (समलैंगिक इत्यादी) समुदाय, महिला, कामगार आणि शेतकरी यांसारख्या पारंपरिक कॉर्पोरेट माध्यमांनी आजवर बाजूला फेकलेल्या चळवळी आपल्या जाणिवेपर्यंत आल्या आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे बाजारपेठेचे  प्रवर्तक आहे. त्यामुळे ते मूलतः व्यावसायिक आहे. याबाबत काहीही शंका नसली तरीही ते संघटित होण्यासाठी अपारंपारिक पर्याय उपलब्ध करून दिले जात आहेत. इजिप्तची अरब स्प्रिंग चळवळ आठवतेय का? मात्र, तळागाळातल्या संघटनाच्या आधाराशिवाय विद्रोहाची ही ठिणगी विझून जाऊ शकते याची जाणीव असण्यातच कौशल्य आहे.
भारतातही आपण दलित बहुजन आवाज या मंचांवरून निघताना पाहिले आहेत. जर दिलीप मंडल यांच्यासारखे ज्येष्ठ पत्रकार या माध्यमाचा कुशलतेने वापर करू शकतात. तर चंद्रशेखर आझाद सारखा बहुजन आयकॉन त्याच्या झटपट करिष्म्यासमोर जुलमी प्रशासनालाही वाकायला भाग पाडू शकतो. जानेवारी 2019 च्या सुरुवातीला भीमा कोरेगाव, अमरावती आणि लातूर येथे जमलेले हजारो लोक आठवतायत ना? ग्रामीण, दलित, महिला, ट्रांसजेंडर सर्वांनाच अशा प्रकारचा आवाज मिळाला आहे. त्यामूळेच कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या मुद्द्याबाबत #मीटू सारख्या चळवळी आपली व्यापक मूल्ये आणि जाणिवांमध्ये लक्षणीय बदल घडवू शकतात.
शेतीवरचे संकट आणि शेतकरी आत्महत्या यासारख्या व्यापक मुद्द्याच्या रिपोर्टिंगला केवळ ‘सुसाईड कव्हरेज’ असे संकुचित गौण स्थान दिले गेले असतानाच्या काळात सहसा हातभर लांब राहणाऱ्या आणि विस्कळीत अशा मध्यमवर्गीयांच्या सदसदविवेकबुद्धीवर आघात करून भारतीय शेतकऱ्यांनी मुंबईच्या भूमीला त्यांच्या समस्यांचा विचार करायला भाग पाडले. ‘शहरात वाढलेल्या स्वमग्न मुलांच्या परीक्षा’ डिस्टर्ब होऊ नयेत म्हणून आझाद मैदानाच्या दिशेने अगदी रात्रीच्या वेळीही चालायची तयारी दाखवणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या काटक आणि विनम्र पावलांनी मुंबईकरांच्या उदासीनतेलाही लक्षणीयरित्या खिंडार पाडले.
गेल्या दशकभरात, आम आदमी पार्टी (आप) सारख्या राजकीय संघटनांनी त्यांच्या चपळ आणि कल्पक धोरणांनी भारताच्या शहरी भागातील तरुणांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याचबरोबर जहालमतवादी वर्चस्ववादी उजव्या संघटनांनी नोकऱ्या आणि अच्छे दिन यांचे खोटे स्वप्न दाखवून एक महाप्रक्षोभक नेता सर्वसामान्य जनतेच्या गळ्यात मारला आहे. पण वास्तवात विद्वेषावर आधारित एक कठोर राजकीय कार्यक्रम हेच त्यांचे खरे आणि अंतिम उद्दिष्ट आहे.
या पार्श्वभूमीवर आम्ही विचारतो आहोत की: वेगवेगळी मते असलेले (भारतीय लोक नक्कीच ठाम मते असलेले आहेत!) परंतु व्यापक, संवैधानिक अवकाशाशी बांधिलकी सांगणारे (जे धोक्यात आहे), पक्षीय आणि अ-पक्षीय असे दोन्ही लोकशाहीवादी विरोधक असलेले नागरिक, सुरुवातीला रांगत रांगत पण नंतर लढा देऊन सोशल मीडियावरच्या स्वतःच्या जागेवर पुन्हा हक्क प्रस्थापित करू शकतील का?
येत्या शनिवारी, नेटिझन्स फॉर डेमोक्रसी, एक दिवसीय चर्चासत्रात या मजबूत आणि विरोधी मतांना एकत्र एकत्र आणून मतभिन्नता आणि लोकशाही यांच्यासाठी एक मजबूत लिंक आणि नेटवर्क बनवण्याचा प्रयत्न करेल.
(https://netizensfordemocracy.in/).
आयएनडीएएसडीए फाऊंडेशन, मुंबई विद्यापीठाचा नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र विभाग (निवडणूकशास्त्र आणि निवडणूक अभ्यास), लेट मुंबई ब्रीद आणि क्यूटीपी प्रॉडक्शन्स यांच्या सहकार्याने तसेच सीपीआय (एम), आप, काँग्रेस (आयएनसी) यांच्या युवा संघटनांच्या प्रतिनिधित्व आणि भागीदारीने, सबरंग इंडियाद्वारे आयोजित हे चर्चासत्र सोशल मीडिया आणि लोकशाही या दरम्यानच्या गुंतागुंतीच्या संबंधांची जाणीव ठेऊनच यशप्राप्ती आणि संवादांसाठीच्या शक्यता निर्माण करण्याचा प्रयत्न करेल.
गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फॉलोईंग/अनुयायी वर्ग जमा होताना पाहिले आहे. त्याचबरोबर, या राक्षसाचा वापर ट्रोल करण्यासाठी, शाब्दिक शिवीगाळ करण्यासाठीही झाला आहे आणि काही वेळा याचे रूपांतर प्रत्यक्ष शारीरिक हल्ल्यांमध्येही झाले आहे. (इंटरनेटवरील) विद्वेषाचा समर्थपणे मुकाबला करत स्वतःचा एक शाश्वत समर्थक वर्ग आणि फॉलोअर्स निर्माण केलेले तरुण तसेच ज्येष्ठ नायक या चर्चासत्रात सहभाग घेणार आहेत.
इंडिया टुडे (हिंदी) चे माजी व्यवस्थापकीय संपादक दिलीप मंडल, अभिनेता तसेच सार्वजनिक बुद्धिवादी प्रकाश राज, आयकॉनिक पत्रकार राजदीप सरदेसाई, केवळ युद्धखोरीच्याच नव्हे तर अभाविपसारख्या हिंसक विद्यार्थी संघटनेच्या विरोधात उभ्या ठाकल्याबद्दल ट्रोल केली गेलेली तरुण विद्यार्थिनी गुरमेहर कौर, प्रचंड शिवीगाळ केला गेलेला आणि प्रत्यक्ष शारीरिक हल्ल्यातून बालंबाल बचावलेला उमर खालिद, एलजीबीटीक्यूआयएचा आवाज हरीश अय्यर, लखनऊमधील तरुण तडफदार नेता रिचा सिंह, आणि आपल्या मुंबईची नंदिता दास.
सोशल मीडियामुळे माहिती मिळवण्याच्या प्रक्रियेचे लोकशाहीकरण झाले आहे हे जरी वास्तव असले तरीही त्याची निव्वळ संरचना आणि स्वरूप यामुळे सोशल मीडिया ही एक क्रूर, दुधारी तलवार बनली आहे. त्याचा वापर करणारे, विशेषत: जे आर्थिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या आणि संरचनात्मकदृष्ट्या अधिक शक्तिशाली आहेत, ते इतरांचा आवाज दाबण्यासाठी एकाच वेळी माहिती सेन्सॉर करू शकतात आणि तिच्याशी छेडछाडही करू शकतात. अशा प्रवृ्त्ती विरोधात कसे लढावे यासाठी एकदिवसीय चर्चा सत्र आयोजित करण्यात आले आहे.
या शनिवारी वांद्रे येथील फा. ऍग्नेल कॅम्पसमधील संवाद हॉलमध्ये भरणाऱ्या या एक दिवसीय चर्चासत्रात भविष्यातील सहकार्य आणि कारवाईसाठी धोरणे ठरविण्याच्या दृष्टीने पथदर्शी विचारविनिमय होईल याची खात्री आहे.
(लेखिका पत्रकार, कार्यकर्त्या आणि शिक्षणतज्ज्ञ आणि सिटिझन्स फॉर जस्टिस अँड पीसच्या सचिव आहेत; cjp.org.in

Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997