Home Election 2019 महाराष्ट्रातील जनता या नालायक लोकांना माफ करणार नाही- विजय वडेट्टीवार

महाराष्ट्रातील जनता या नालायक लोकांना माफ करणार नाही- विजय वडेट्टीवार

Support MaxMaharashtra

शिवसेना आणि भाजपमध्ये सत्तेसाठी रस्सीखेच सुरू आहे. तर आघाडी देखील सत्तास्थापनेच्या तिढ्यावर खोळंबत राहिली आहे. काल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर अशोक चव्हाण, नितीन राऊत, अशा अनेक काँग्रेस नेत्यांमध्ये चर्चा पार पडली. तर याबाबत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी कोणताही निर्णय घेत नसल्याने हा पेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येऊन सोडवतील का हा प्रश्न आहे. दरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना म्हटले की जनतेनी तुम्हाला सत्तेत बसण्यासाठी कौल दिला, मात्र जनतेचे प्रश्न सोडवण्या ऐवजी तुम्ही सत्तेसाठी भांडत बसलात आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलात, हे सरकार शेतकऱ्यांचे मारेकरी आहेत अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केली.


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997