Home पर्सनॅलिटी होश में आओ….

होश में आओ….

फोटो हरीश शेट्टी यांच्या फेसबुक वॉल वरून
Support MaxMaharashtra

‘होश’ ही ‘मीटू’ इतकीच महत्वाची चळवळ आहे. या वर्षी दिवाळीत सर्वत्र उत्साहाचं वातावरण होत, मिठाई, फराळ यांच्याशिवाय आपले कुठलेच सण पूर्ण होऊ शकत नाहीत. कुठल्याही धर्माचा सण असू दे, त्या-त्या सणांची वैशिष्टपूर्ण खाद्यसंस्कृती तयार झालेली असते. मात्र, आता सणांच्या दिवसांच मिठाई खायची म्हटली तरी मनात अनेक शंका-कुशंका येतात. सणांच्याच काय इतर कुठल्याही दिवसांत दूध खरेदी करताना मनांत भीती असतेच. दुधाचं जितकं उत्पादन होतं त्यापेक्षा जास्त दूध भारतात विकलं जातंय. थोडक्यात आपण स्वत:च्या हाताने दररोज विष खातोय, आणि यावरच लोकांचं, शेतकऱ्यांचं, व्यापाऱ्यांचं प्रबोधन करण्यासाठी एक माणूस गेली कित्येक वर्षे झटपटतोय.. त्या माणसाचं नाव आहे हरिश शेट्टी.
अंधेरी च्या एसव्ही रोडवरचं हरिश शेट्टी यांचं राधाकृष्ण हॉटेल एक लँडमार्कच झालंय. हॉटेलच्या व्यवसायात इतर हॉटेलवाले जसं करतात तसं करून हरिश शेट्टी गडगंज नफा कमवू शकले असते. मात्र हरिश शेट्टी यांच्या डोक्यात काही वेगळंच होतं. दिवसें-दिवस वाढत जाणारे कँसर पेशंटस, इतर आजाराचे रूग्ण या सर्वांमागे आपली आहार पद्धती कारणीभूत आहे असं त्यांचं मत आहे. पंचतत्वांपैकी जमीन, पाणी आणि हवा यांनी प्रदूषणाचा सर्वांत वरचा थर गाठला आहे. यामुळे आपण या प्रदूषणातून जे जन्माला येतंय ते विष खातोय. निश्चितच त्याचा विपरीत परिणाम आपल्या संपूर्ण आरोग्यावर होत असतो.
आपल्या खाण्यातून जडणाऱ्या विकारांपासून सुटका हवी असेल तर आपल्याला आपल्या अन्नावर लक्ष द्यायला हवं आणि त्यासाठी शेतकरी, व्यापारी, ग्राहक या सर्वांची मोट बांधली पाहिजे असा ध्यास घेऊन हरीश शेट्टी यांनी #HOSH ही मोहीम सुरू केली आहे. हरीश शेट्टी हे दररोज पाचशे वयोवृद्ध, आजारी तसंच गरजूंना विषमुक्त जेवणाचे डबे मोफत पोचवतात. हरीश शेट्टी सध्या मुंबईतल्या विविध कॉलेजांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनाही या विषयाचं गांभीर्य समजवून सांगतायत.
हरीश शेट्टी यांनी शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांना विषमुक्त शेती साठी प्रोत्साहित केलंय. तसंच शेतकऱ्यांचं सर्व शेतमाल चांगल्या किंमतीत थेट विकत घ्यायचा निर्णय घेतलाय. मुंबईतल्या दोन हजार हॉटेल मालकांनाही शेट्टी यांनी विनंती केली आहे की त्यांनी थेट शेतकऱ्यांकडून सेंद्रीय पद्धतीने पिकवलेला शेतमाल विकत घ्यावा.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997