का केला जातोय महाविद्यालयीन प्राध्यापकांवर अन्याय?

का केला जातोय महाविद्यालयीन प्राध्यापकांवर अन्याय?

समान कालावधीत मान्यता मिळालेल्या 27 महाविद्यालयांना अनुदानित तर 53 महाविद्यालयांना कायम विनाअनुदानित तत्वावर मान्यता दिल्याने समान न्यायाच्या तत्वानुसार या 53 महाविद्यालयांना 100% अनुदान मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील महाविद्यालयीन प्राध्यापक शिक्षक दिनापासून आमरण उपोषण करत असुन त्यांच्याकडे सरकारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केलेले आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाने 24 नोव्हेंबर 2001 रोजी कायम विना अनुदानाचे धोरण राबवले मात्र त्या पूर्वी मान्यता दिलेल्या काही महाविद्यालयांना पूर्वलक्षी प्रभावाने कायम विनाअनुदानित तत्वावर मान्यता दिल्यामुळे गेल्या 19 वर्षांपासून त्या 53 महाविद्यालयातील प्राध्यापक शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे विनाअनुदानित तत्वावर काम करत आहेत.
आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांच्याशी संपर्क साधला असता “आंदोलक शिक्षकांचा प्रश्न शासन दरबारी पाठवलेला असुन, जो पर्यंत राज्य शासन निर्णय घेत नाही तो पर्यंत आम्ही काहीही करू शकत नाही” असे सांगितले.

का केला जातोय महाविद्यालयीन प्राध्यापकांवर अन्याय.#maxmaharashtra #मॅक्समहाराष्ट्र #विनोद_तावडे #आशिष_शेलार

Maxmaharashtra द्वारा इस दिन पोस्ट की गई सोमवार, 9 सितंबर 2019