Home News Update खाकी वर्दीतला माणूस मजबूत करा – उध्दव ठाकरे

खाकी वर्दीतला माणूस मजबूत करा – उध्दव ठाकरे

Support MaxMaharashtra

मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर उध्दव ठाकरे आज पहिल्यांदाच पोलिस महासंचालकांच्या कार्यालयात गेले आणि त्यांनी खाकी वर्दीतल्या माणसाला जागं करा असा संदेश पोलिस खात्याला दिला. महिलांवरील अत्याचार प्रकरणात तातडीने कारवाई झाली पाहिजे आणि निर्भया फंडातील (Nirbhaya Fand) सर्व निधीचा विनियोग करा असे आदेश त्यांनी पोलिस विभागाला दिले.

मुख्यमंत्री ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र पोलीस दलाच्या (Maharashtra Police) कामाची वाखाणणी नुकत्याच पार पडलेल्या देशातील पोलीस महासंचालकांच्या परिषदेत झाली. त्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे, महिला अत्याचाराच्या प्रकरणात तात्काळ व जलद कार्यवाही करून गुन्हेगारांना वचक बसेल असं काम करावे असं ठाकरे यांनी सांगितलं.

गेल्या शासनाच्या कालावधीत निर्भया फंड मधील निधी खर्च न झाल्याची बाब गंभीर आहे. हा निधी तात्काळ कशा पद्धतीने त्याचा त्वरित विनियोग करता येईल, याची कार्यपद्धती तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी ज्या ज्या आवश्यक असतील त्या सर्व सुविधा शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात येतील. आपल्या सरकारला खाकी वर्दीच्या आतला माणूस मजबूत करायचा आहे, असं ठाकरे यांनी या बैठकीत सांगितलं.

सर्वसामान्य नागरिकाला पोलीसांविषयी आदर आणि त्याचबरोबर दरारा वाटला पाहिजे, काही वेळा न्याय्य मागण्यांसाठी सर्वसामान्य नागरिक अहिंसात्मक मार्गाने रस्त्यावर उतरतात. अशा वेळी नोंदविण्यात आलेले गंभीर गुन्हे वगळता साध्या स्वरुपाचे गुन्हे काढून घेण्यासाठी सकारात्मक पावले टाकावीत. अतिशय आवश्यक असेल तेव्हाच बळाचा वापर केला पाहिजे. असंही ठाकरे यांनी बैठकीत सांगितलं.

पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करून पोलिसांचे प्रश्नं सोडवण्यासाठी हे सरकार पुढाकार घेईल असं आश्वासन ठाकरे यांनी दिलं.

या बैठकीत महाराष्ट्रातील पोलिस दलाच्या कामाचा आढावा मुख्यमंत्री यांच्यापुढे सादर करण्यात आला. मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर असून त्याकडे जगाचे लक्ष असते. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वीच शहराच्या सुरक्षिततेसाठी सतत सतर्क रहावे, अशाही सूचना त्यांनी यावेळी केल्या.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997