मिलॉर्ड तुम्ही सुद्धा?

मिलॉर्ड तुम्ही सुद्धा?

स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप झाला. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर करण्यात आलेल्या लैंगिक शोषणाचा आरोप गंभीर असून या आरोपामुळे भारताच्या न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च व्यक्तीच्या विश्वासार्हबरोबरच न्यायव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपाची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे. परंतु या समितीने पीडित महिलेला तिचं म्हणणं मांडायला पूर्ण संधी दिली का? तिच्या म्हणण्यात तथ्य नसेल तर तिची बदली सरन्यायाधीशांच्या निवासस्थानातील कार्यालयात का करण्यात आली? या संपूर्ण प्रकरणामध्ये पारदर्शकता होती का? तिच्या कुटुंबातील व्यक्तींना कामावरुन का काढले? या सारख्या अनेक प्रश्नाची उत्तर अजूनही अनुत्तरीतच आहेत…
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर गंभीर आरोप झालेले असताना आणि त्यातील अनेक प्रश्न अनुत्तरीत असताना अशा पद्धतीने सरन्यायाधीशांना क्लीन चीट दिल्यानंतरही काही प्रश्नाचं समाधान होत नाही. त्यामुळे ज्या न्यायव्यवस्थेवर लोकांचा विश्वास आहे. त्याच ठिकाणी जर अशा प्रकारे आरोप होत असतील तर देशातील जनतेच्या मनात शंका उपस्थित होणं साहजिक आहे. या सर्व प्रकरणावर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचे विश्लेषण