Home News Update नवरत्न विकण्यासाठीच नागरिकत्व कायद्यात सुधारणा.. – प्रकाश आंबेडकर

नवरत्न विकण्यासाठीच नागरिकत्व कायद्यात सुधारणा.. – प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar
Courtesy : Social Media
Support MaxMaharashtra

सिटीझनशिप कायद्यातील दुरूस्तीची गरज नाही. फाळणीनंतर भारतात आलेल्या लोकांना भारताचं नागरिकत्व देण्यात आलं. दोनदा अशी संधी शरणागतींना देण्यात आली. त्यानंतर त्यानंतर भारतीय संसदेला कायदा अधिकार बनवायचा अधिकार दिला गेला.

सेक्शन ५ प्रमाणे नागरिकत्वासाठी अर्ज करावा लागतो. त्यानंतर हा कशा पद्धतीचा नागरिक असेल हे ठरवलं जातं. अमेरिकेच्या ग्रीन कार्ड प्रमाणे भारतात ही कायदा आहे. त्याला सेक्शन ६ अंतर्गत नाकरिकत्व मिळतं.
ज्याला नैसर्गिक नागरिकत्व हवं असतं तो तसा अर्ज करतो आणि त्याला नैसर्गिक नागरिकत्व मिळतं. त्याला मताचा अधिकार मिळतो.

हे ही वाचा…

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडण्यास मंजूरी
सुविधा नसलेलं गाव : ‘हे गाव अजुनही पितंय, डोंगरातील पाणी’
‘दादा’गिरी जरूर चलेगी! – हेमंत देसाई

१९४८ मध्ये संसदेत मंजूर करण्यात आलेल्या कायद्याप्रमाणे फ्रँचाइस हा शब्द वापरण्यात आलेला. ऍक्ट ऑफ रेसिप्रोकेट म्हणजे भारतातील एखादा नागरिक दुसऱ्या देशात नागरिकत्व मिळताना जे फायदे मिळतात तेच फायदे त्यांच्या नागरिकांना आपल्या देशात मिळणार आहेत. दुर्दैवाने त्या कायद्याचा फार उपयोग झाला नाही..

देशातील नव रत्ने विकण्याचा घाट घातला जातोय, जीएसटी ६ टक्क्यांनी वाढवण्याचा घाट आहे. महसूल आणि खर्च यांचा ताळमेळ बसत नाहीय. अशा वेळी लोकांना फसवण्यासाठी, भयानक अर्थव्यवस्थेची खरी परिस्थिती लोकांसमोर येऊ नये म्हणून नागरिकत्व सुधारणा विधेयक आणून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे.

सर्वसामान्य नागरिकांना विनंती करतो की त्यांनी सरकारच्या भूलथापांना बळी पडू नये. यातून काहीही साध्य होणार नाही. ज्या पद्धतीने त्यांनी आसाम मध्ये गोंधळ घातलाय तोच गोंधळ घालायचाय. यांना नव रत्ने विकायचीय त्यामुळे हे बिल आणलंय असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997