कापलेल्या झाडांना आरे वासियांची भावपूर्ण श्रध्दांजली

कापलेल्या झाडांना आरे वासियांची भावपूर्ण श्रध्दांजली

‘आरे’मध्ये मेट्रो कारशेडसाठी रात्रीच्या अंधारात झाडं कापण्यात आली. या झाडांना वाचण्यासाठी आरेवासीयांनी आणि पर्यावरण प्रेमींनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, पोलिसांच्या ताकदीपुढे हे प्रयत्न तोकडे पडले. त्या झाडांना मिठी मारून वाचवणारे हात तिथपर्यंत पोहचूचं शकले नाहीत. त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात प्रसंगी अनेकांना तुरुंगातही जावं लागलं. यावर दुःख व्यक्त करताना आरे वासियांनी कत्तल झालेल्या झाडांसाठी भावपूर्ण शृंद्धाजली वाहिली आहे.

“तुम्हाला वाचविण्यासाठी आम्ही अथक प्रयत्न केले,
प्रसंगी काही तुरुंगातही गेले,
यानंतरही आम्ही तुमचे प्राण वाचवू शकलो नाही,
तर आम्हांला क्षमा करा…

असा संदेश देत आरे वासियांची आरे वाचवा अशी साद…पाहा व्हिडिओ