‘आम्ही काँग्रेसच्या आमदारांना पैशाचं आमिष दाखवत नाही’ – जेपी नड्डा 

‘आम्ही काँग्रेसच्या आमदारांना पैशाचं आमिष दाखवत नाही’ – जेपी नड्डा 

jp nadda, जेपी नड्डा, congress, bjp, marathi news, maxmaharashtra
सध्या काँग्रेसमध्ये जोरदार पक्षांतर सुरु आहे. काँग्रेसमधील बड्या नेत्यांची भाजपात इनकमिंग सुरु असल्यामुळे भाजपावर पैशाचा आमिष दाखवून काँग्रेस फोडण्याचा आरोप होत आहे. या आरोपाला भाजपचे कार्याध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी फेटाळलं असून हे आरोप निराधार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तसेच काँग्रेस-मुक्त भारत म्हणजे काँग्रेस संस्कृतीचा शेवट भ्रष्टाचार, घराणेशाही आणि वोट बँक राजकारणाचा शेवट. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने ते साध्य केलं असल्याचं म्हटलं आहे.
क्रिकेटपटू एम. एस. धोनी हे निवृत्तीनंतर भाजपमध्ये प्रवेश करतील का यावर नड्डा म्हणाले, “आम्ही आमच्या पक्षातील समाजाच्या प्रत्येक विभागाचे स्वागत करतो.”
वाढत्या मॉब लिंचिंगच्या प्रकरणावर बोलताना नड्डा म्हणाले, “कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. भाजपचा ‘सबका साथ सबका विकास’ या धोरणावर विश्वास आहे”.