Chandrayaan 2 : तांत्रिक कारणामुळे चांद्रयान स्थगित

Chandrayaan 2 : तांत्रिक कारणामुळे चांद्रयान स्थगित

74
0

भारताच्या बहुचर्चित चांद्रयान २ मोहीमेला आज स्थगिती देण्यात आली. तांत्रिक कारणामुळे चांद्रयानाचं होणारं प्रक्षेपण थांबवण्यात आलं असून हे यान पुन्हा कधी प्रक्षेपित होईल याबाबत नवा कार्यक्रम लवकरच कळवण्यात येईल असं इसरो ( ISRO ) कडून सांगण्यात आलंय.

चांद्रयान 2 साठी सर्व तयारी पूर्ण झाली होती. क्रायोजेनिक इंजिन मध्ये द्रवरूप ऑक्सीजनचा भरणा झाल्यानंतर द्रवरूप हायड्रोजनचं भरणा सुरू असल्याचं इसरो चं ट्वीट होतं. त्यानंतर सर्व तयारी पूर्ण झाली असून रात्री 2.30 वाजता GSLVMkIII चांद्रयान 2 मोहीमेकरता उड्डाण भरेल असं इसरो कडून सांगण्यात आलं होतं. त्यानंतर तांत्रिक कारणामुळे Launch Vehicle system या प्रक्षेपण यंत्रणेत आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे हे प्रक्षेपण थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.