चंद्रकांत दादांची ‘दादागिरी’; मदतीची मागणी करणाऱ्याला म्हणाले, ‘ए गप्प’!

चंद्रकांत दादांची ‘दादागिरी’; मदतीची मागणी करणाऱ्याला म्हणाले, ‘ए गप्प’!

कोल्हापूर-सांगलीच्या महापूरात अडकलेल्या नागरिकांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरु असताना कोल्हापूरते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा एक नवा प्रताप समोर आला आहे. कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागात दौऱ्यावर असताना मदतीची मागणी करणाऱ्या एका ग्रामस्थाला चंद्रकांत पाटलांनी चक्क ए गप असा दम भरला.
गेल्या ५ ते सहा दिवसांपासून जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये नागरिक अडकून पडलेत. त्यातल्या काही ठिकाणी भीषण परिस्थिती असल्यानं शासकीय मदत पोहोचण्यात अडचणी येत आहेत. त्यात चंद्रकांत पाटील हे पूरग्रस्त भागात पहाणी करत असताना पुलाची शिरोली गावात त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पाटील बोलत असताना लोकांमधून मदत मिळत नसल्यानं ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. यावेळी चिडलेल्या चंद्रकात पाटलांनी ए गप असं म्हणत नुसत्या तक्रारी करून काही होत नाही, असं ठणकावलं.