Home News Update चंद्रकांत पाटलांची भाषा हुकूमशाहीची – विश्वजीत कदम

चंद्रकांत पाटलांची भाषा हुकूमशाहीची – विश्वजीत कदम

कडेगाव – पलूस विधानसभा मतदारसंघावर दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांचेच कायम वर्चस्व राहिले. त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत डॉ. विश्वजीत कदम मोठ्या मताने निवडून आले. मात्र, आता निवडणूकीची गणित बदलली आहेत. कॉंग्रेसकडून पुन्हा एकदा विश्वजीत कदम यांना कडेगाव – पलूस मतदार संघातून उमेदवारी जाहीर झाली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पूराने या भागातील जनतेचं जनजीवन विस्कळीत झालं. त्यामुळे या पुराचा निश्चितपणे या निवडणुकीवर परिणाम होणार आहे. या बदलेल्या सर्व राजकीय गणितांबरोबर डॉ. विश्वजीत कदम निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. या संदर्भात मॅक्समहाराष्ट्रचे संपादक रविंद्र आंबेकर यांनी डॉ. विश्वजीत कदम यांच्याशी बातचित केली.

Support MaxMaharashtra


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997