Home > अहिराणी > दिशा कायद्यानं विधेयक याच अधिवेशन मा- गृहमंत्री

दिशा कायद्यानं विधेयक याच अधिवेशन मा- गृहमंत्री

दिशा कायद्यानं विधेयक याच अधिवेशन मा- गृहमंत्री
X

पोरी आणि बायासवर बरंवाईट करणारास्वर आंध्रप्रदेश सरकारनी जसा कायदा करा तसा कायदा आपला राज्यमा भी कडक कायदा करी राहिनूत अशी घोषणा राज्यना गृहमंत्री अनिल देशमुख ह्यासनी विधानसभा मा आज करी.

हिंगणघाट मा जी वाईट घटना घडनी त्यावर बोलतांना गृहमंत्रीस्नि हाई माहिती दिनी.

काँग्रेस पक्षनी आमदार प्रणिती शिंदे ह्यासनी मागणी करी की ज्या बाई बाबतमा वाईट घडण त्या बाईले पोलीस ठेसंनमा बलावना पेक्षा तिना घरमाच पोलिससनी जावाले पाहिजे, ह्या घटनामा गुन्हेगार ले रंगेहात पकडेल शे त्या घटनाना सोक्षमोक्ष लगेच लागाले पाहिजे.

हिंगणघाट मा जी जळीत घटना घडा नंतर राज्यमा पोरी आणि बायासवर वाढत जाणाऱ्या घटनासमुळे आंध्रप्रदेश सारखा कडक कायदा करानी मागणी होती त्याले धरिसन होऊ आपला राज्यनी "दिशा कायदा "करा अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुखनी करी

काय शेत होऊ "दिशा कायदा" ना कडक तरतुदी -

पोरी किंवा बाईवर बलात्कार करा ते 21 दिवसमा कोर्ट मा खटला चालीसनी एकदम कडक शिक्षा व्हई,

यामा बलात्कार आणि सामूहिक बलात्कार करणारावर आरोप सिद्ध व्हई ग्यात तर मृत्युदंड देतस,

21 दिवस मा फाशी देवानी तरतूद शे.

आंध्रप्रदेश ना तेरा जिल्हास्मा विशेष न्यायालय नी स्थापना करेल शे.

Updated : 26 Feb 2020 6:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top