Home > मॅक्स वूमन > पावसाने पाठ फिरवली तरी शासन तुमच्यासोबत आहे – पंकजा मुंडे

पावसाने पाठ फिरवली तरी शासन तुमच्यासोबत आहे – पंकजा मुंडे

पावसाने पाठ फिरवली तरी शासन तुमच्यासोबत आहे – पंकजा मुंडे
X

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व त्यांची बहीन भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी सोमवारी बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, "पावसाने पाठ फिरवल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पण घाबरुन जाऊ नका. आपण सर्व मिळून आपत्तीवर मात करू, दुष्काळाला घाबरुन जाऊ नका, धीर सोडू नका. पावसाने पाठ फिरविली असली, तरी शासन तुमच्या सोबत आहे, झालेल्या नुकसानासाठी शासनाची मदत मिळवून देण्यासाठी आपण कटीबद्ध" असल्याचं सांगून त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.

Updated : 17 Oct 2018 11:30 AM GMT
Next Story
Share it
Top