Home News Update अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या भावाची गुंडगिरी

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या भावाची गुंडगिरी

Support MaxMaharashtra

राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे भाऊ नगरसेवक कप्तान मलिक यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये कप्तान मलिक रस्त्यावर काम करणाऱ्या कामगारांना ‘वर्क ऑर्डर कुठं आहे?’ असा प्रश्न विचारत मारहाण करत आहेत. या त्यांनी या कामगारांना मारहाण केलीये तसंच शिवगाळ करत पुन्हा दिसले तर हातपाय तोडून टाकेन अशी धमकीही दिलीये.

या व्हिडीओमध्ये अत्यंत खालच्या पातळीच्या शिव्या देताना देखील कप्तान मलिक दिसून येत आहे. विशेष बाब म्हणजे ज्या तरुणांना मारत आहेत, त्या तरुणांना माझ्यावर केस करा, पोलिसात तक्रार करा असंही मोठमोठ्यानं सांगतान दिसत आहेत. कप्तान मलिक यांच्याशी मॅक्स महाराष्ट्रनं जेव्हा संपर्क साधला तेव्हा फोनवरुन प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. तसंच ही घटना महिनाभरापूर्वीची असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

तसंच ही मारहाण का केली त्याचं कारणही समजून घ्या असं सांगत त्यांनी फोनवर बोलणं टाळलं. व्हिडिओ जरी महिनाभरापूर्वीचा असला तरी एका मंत्र्यांचा भाऊ आणि नगरसेवक अशाप्रकारे रस्त्यावर काही कामगारांना मारहाण आणि शिवीगाळ करत कायदा हातात घेत असल्याचं दिसतंय. आता राष्ट्रवादी काँग्रसेकडेच गृहखातं आहे तेव्हा पोलीस एका कॅबिनेट मंत्र्यांच्या नगरसेवक भावावर कारवाई करणार का असा सवाल उपस्थित होतोय.

 

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997